ChatGPT च्या मदतीने छोट्या व्यवसायाला मोठी झेप
डेरेक आणि लारिसा गेटर आपला छोटा व्यवसाय मनोरंजन क्षेत्रातील मोठा व्यवसाय बनवण्यासाठी ChatGPT वापरत आहेत.

“अनेक वर्षांपासून आम्ही मोठी स्वप्ने पाहत आलो आहोत. ChatGPT येण्यापूर्वी ती प्रत्यक्षात आणणे शक्य आहे, असे मला वाटत नव्हते. आता सर्व काही शक्य आहे.”
Big Air ची उभारणी
अकरा वर्षांपूर्वी डेरेक आणि लारिसा गेटर यांनी ATV Big Air Tour हा फिरता ATV स्टंटचा कार्यक्रम सुरू केला. त्यांनी एक छोटा प्रादेशिक उपक्रम म्हणून सुरुवात केली, पण लवकरच त्यांचा दौरा देशातील सर्वाधिक यशस्वी मोटारक्रीडा दौऱ्यांपैकी एक बनला.
त्यांना व्यवसायाचा आणखी विस्तार करायचा होता, पण कामाचा प्रचंड व्याप आणि अपुरे मनुष्यबळ हे त्यांच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान होते. तीन लहान मुलींचे संगोपन करतानाच ते कार्यक्रमाची व्यवस्था आणि छोटा व्यवसाय चालवण्याची प्रशासकीय कामेही सांभाळत होते. कामाचा वेग कायम राखण्यासाठी कार्यक्रमाच्या बहुतेक दिवशी ते पहाटे 3 वाजेपर्यंत काम करत असत.

प्रत्येक कार्यक्रमासाठी स्थानिक प्रेक्षणीय स्थळे आणि रंजक तथ्ये अधोरेखित करणारे स्क्रिप्ट लिहिण्यास ChatGPT डेरेकला मदत करते.

कार्यक्रमाच्या दिवशी लारिसा ChatGPT व्हॉइस मोडचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून वापर करते.

डेरेक आणि लारिसा ChatGPT वापरून स्वारांच्या वेळापत्रकांचा मागोवा ठेवतात.
दौऱ्याला नवी झेप
डेरेक आणि लारिसाला 2023 मध्ये ChatGPT बद्दल समजले आणि लवकरच त्यांनी संपूर्ण व्यवसायात त्याचा वापर सुरू केला. आता ते मार्केटिंगची योजना, सोशल मीडियांसाठी धोरणे, ग्राहक अहवाल, दौऱ्यांची वेळापत्रके आणि उपकरणांच्या साठ्याचे अहवाल तयार करण्यासाठी ChatGPT वापरतात.
कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष स्थळीही ते ChatGPT वापरतात. स्पीकर्स आणि रंगमंच उभारण्यासाठी ते त्याचा साउंड इंजिनिअर म्हणून, तर उपकरणांतील बिघाड शोधण्यासाठी तंत्रज्ञ म्हणून वापर करतात. स्थानिक प्रेक्षकांशी अधिक चांगले नाते जोडण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाची खास स्क्रिप्ट तयार करण्यात ChatGPT डेरेकला मदत करते, तसेच भेटवस्तू आणि विक्रीच्या वस्तूंचा मागोवा ठेवण्यात लारिसाला मदत करते.
“ChatGPT मुळे सर्व गोष्टी सोप्या होत आहेत. ज्या कामाला साधारणपणे दोन आठवडे लागले असते, ते आम्ही एका सकाळीच पूर्ण केले.”
साउंड इंजिनिअरिंग
ग्राहक आढावा अहवाल
मार्केटिंगची योजना
प्रवासात असतानाही व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यास ChatGPT त्यांना मदत करते. ते त्यांच्या दिवसाचे नियोजन करते, ग्राहकांशी झालेल्या संवादाचा मागोवा ठेवते, संभाव्य प्रायोजकत्वांचे मूल्यमापन करते आणि अडचणींचे तत्काळ निराकरण करते, त्यामुळे त्यांना शक्य तितका उत्तम कार्यक्रम सादर करण्यावर लक्ष केंद्रित करता येते. कोट्यवधी डॉलरच्या मनोरंजन व्यवसायांशी स्पर्धा करणाऱ्या छोट्या व्यवसायासाठी ही सोय महत्त्वाची आहे.
“सतत प्रवासात असताना परिस्थितीनुसार जुळवून घ्यायला शिकावेच लागते. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगदी आधी कोणतीही अडचण येऊ शकते. मग ताबडतोब दिशा बदलून ते कसे यशस्वी करायचे, हे शोधावे लागते.”

ATV Big Air Tour मध्ये मोटारक्रीडेचा सळसळता उत्साह आणि कुटुंबासाठी अनुकूल वातावरण यांचा संगम होतो.

डेरेक ChatGPT चा वापर पोर्टेबल साउंड इंजिनिअर म्हणून करतो.

हा कार्यक्रम देशभरातील सोहळ्यांमध्ये गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणाऱ्या ATV आणि मोटोक्रॉस स्टंटचा तासभराचा थरार सादर करतो.

“उद्योजक असण्यात खूप स्वातंत्र्य आहे, कारण तुम्ही एखादे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणू शकता.”
मोठी स्वप्ने पाहणे
ChatGPT मुळे वाचणारा वेळ डेरेक आणि लारिसा आता त्यांच्या पुढील ध्येयासाठी वापरत आहेत: खुली नाट्यगृहे आणि क्रीडांगणे चाहत्यांनी भरून टाकणारे स्वतंत्र ATV Big Air Tour कार्यक्रम आयोजित करणे. त्यांना शक्य तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि त्यांच्या तीन लहान मुलींसह ATV स्वार व उद्योजकांच्या पुढील पिढीला प्रेरणा द्यायची आहे.
गेटर दाम्पत्याने कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून आपला संपूर्ण व्यवसाय उभारला. मुली मोठ्या होत असताना त्यांच्यातही उद्योजकतेची वृत्ती रुजवण्याची त्यांची आशा आहे. धाडसी पाऊल उचलण्याची तयारी असेल, तर काहीही शक्य आहे, हे त्यांना दाखवायचे आहे.

आपली उद्योजकतेची वृत्ती तीन मुलींमध्येही रुजावी, अशी डेरेक आणि लारिसाची आशा आहे.

प्रत्येक कार्यक्रमातून ATV स्वार आणि उद्योजकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याची डेरेक आणि लारिसाची इच्छा आहे.

कार्यक्रमानंतर डेरेक आणि लारिसाच्या मुली विक्रीमध्ये मदत करतात.
“ChatGPT मुळे माझ्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी मला कल्पनेपेक्षाही जास्त वेळ मिळाला आहे.”

